breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकड पोलिसांची ‘सिंघम स्टाईल’, सराईत गुंडाची काढली धिंड, बघ्याची गर्दी

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

वाकड परिसरात वारंवार सामान्य नागरिक, व्यापारी, व्यावसायिकांसह महिला-मुलींना त्रास देणा-या सराईत गुंडाना पोलिसांनी खाकी वर्दीचा हिसका दाखविला. त्या चार गुंडाची वाकड बाजारपेठेतून आज (बुधवारी) धिंड काढली. त्यामुळे वाकड पोलिसांची सिंघम स्टाईल कारवाईने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

ही घटना वाकडच्या काळाखडक परिसरात सर्व नागरिकांनी घराबाहेर थांबून अनुभवली. अरविंद गौरवसाठी (वय 20) सूरज पंडित पवार (वय 21), राहुल उर्फ बुग्या हिरामन लष्करे (वय 19) आणि विशाल शहाजी कसबे (वय 23 सर्व रा. काळा खडक, वाकड) अशी या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. यातील विशाल कसबे हा तडीपार गुंड आहे.

वाकडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीष माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी गेल्या काही वर्षांपासून आरोपी परिसरात दहशत निर्माण करत होते. यामुळे आरोपी कसबेला पोलिसांनी तडीपार केले होते तरी देखील तो आपल्या मूळ साथीदारांच्या मदतीने परिसरात येऊन दहशत निर्माण करीत होता.

बुधवारी सकाळी या चारही आरोपींना घेऊन पोलिस काळा खडक परिसरात दाखल झाले. पोलिसांनी काळा खडक परिसरात आरोपींना बेड्या घालून त्यांना बाजारपेठ परिसरातून रस्त्याने चालवत नेत त्यांची धिंड काढली. त्यांना चांगला चोपही दिल्याचे समजते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button