breaking-newsराष्ट्रिय

हजारो मतदार ओऴखपत्रे सापडल्याने कर्नाटकमधील आरआर नगर निवडणूक रद्द

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमधील आर आर (राजराजेश्‍वरी) मतदार संघातील मतदान रद्द करण्यात आलेले आहे. बेंगळुरूमधील एका फ्लॅटमध्ये हजारो मतदार ओळखपत्रे सापडल्याने निवडणूक आयोगाने 12 तारखेला होणारे मतदान रद्द केले असून त्याऐवजी 28 तारखेला मतदान घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. 31 तारखेला मतमोजणी होणार आहे.

मिळालेल्या माहितीप्रमाणे 12 तारखेला होणाऱ्या मतदानापूर्वी चार दिवस अगोदर बेंगळुरूच्या जलाहल्ली भागातील एक फ्लॅटमध्ये निवडणूक आयोगाच्या फ्लाइंग स्क्वॅडने छापा मारून 9746 मतदार ओळखपत्रे जप्त केली. हा भाग आरआर मतदार संघात येतो. मतदार ओळखपत्रे जप्त करताच कॉंग्रेस आणि भाजपाचे परस्परांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. हा फ्लॅट कॉंग्रेस नेत्याचा असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

हे गंभीर प्रकरण आहे. यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त संजीव कुमार यांनी सांगितले आहे. मतदार ओळ्खपत्रे जप्त केल्यानंतर घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मिळालेल्या ओळखपत्रांमध्ये काही बनावट ओळखपत्रेही आहेत. त्याचा निर्णय आम्ही येथे घेऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button