breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

‘त्या’ बालमावळ्याची अमोल कोल्‍हेंनी घेतली भेट

इस्लामपूर – स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेत संभाजी महाराजांना अटक झाल्यानंतर ओक्‍सा बोक्सी रडणाऱ्या कामेरी ता. वाळवा जि. सांगली येथील अंगणवाडीत शिकणाऱ्या श्रीयोग अनिल मानेला स्वत: अमोल कोल्हे यांनी भेटून त्याचा सन्मान केला.

श्रीयोगचा रडणारा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच व्हारल झाला. हा व्हिडीओ पाहून संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अमोल कोल्हे यांनी श्रीयोग व त्याच्या आई वडीलांना मुंबईला बोलवून घेत, त्‍यांचा सन्मान केला. यामुळे माने कुटुंबिय भारावुन गेले.

संभाजी महाराजांची मालिका सुरू आहे. या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही मालिका आता अंतिम टप्प्यात आली आहे. आठ दिवसांपूर्वी मालिकेत संभाजी महाराजांना अटक झालेला सीन दाखवण्यात आला होता. हा सीन पाहताना श्रीयोग हा चिमुरडा ओक्‍सा- बोक्सी रडू लागला. तो का रडतोय याची त्याच्या आईने त्याच्याकडे चौकशी केली असता, त्यावेळी त्याने संभाजी महाराजांना अटक झाली आहे. आता औरंगजेब त्यांना मारणार असे म्हणून तो पुन्हा रडू लागल‍ा. त्यावेळी त्याच्या आईने त्याची समजूत काढली. आईने श्रीयोगला समजावण्याचा प्रयत्‍न केला की, ही घटना तीनशे ते चारशे वर्षापूर्वीची आहे. आता हे फक्‍त मालिकेत दाखवले आहे.

आता संभाजी महाराजांना पकडले नाही. याला खूप वर्ष झाली आहेत. पण श्रीयोगचे रडणे काही थांबेना, तेंव्हा श्रीयोगच्या आईने श्रीयोगला आपण संभाजी महाराजांचा पुतळा घरी आणूया. त्यांची रोज पुजा करूया, असे सांगितल्‍यानंतर तो रडायचा थांबला. दरम्‍यान आईने हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.

तो कामेरीतील श्रीयोग माने याचा असल्‍याचे समजल्‍यानंतर त्‍यांनी माने कुटुंबाशी संपर्क साधुन श्रीयोगवर बालवयातचं शिवसंस्‍कार केल्‍याने त्‍यांचे कौतुक केले. एवढ्यावरचं न थांबता कोल्‍हे यांनी आई आणि लेकराला मुंबईला बोलावले. त्‍यांच्यासाठी गाडी ही पाठवली. श्रीयोगच्या निरागस शिवभक्‍तीने भारावलेल्‍या अमोल कोल्‍हे यांनी त्‍याला बालशिवाजीचा पोशाख दिला, तर श्रीयोगची आई सविता यांना साडी-चोळी देउन त्‍यांनी माने कुटुंबीयांचा सन्मान केला. यावेळी श्रीयोगचे वडील अनिल माने यांनी श्रीयोगला छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीमहारांच्याबद्दल प्रचंड आस्था असल्याचे सांगितले. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button