breaking-newsताज्या घडामोडी

‘त्या’ जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यास अटकपूर्व जामीन मंजूर

बदनापूर | औरंगाबाद जि.प. चा वादग्रस्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गितेला जालना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यामुळे डॉ. गिते याची अटक तूर्त टळली आहे. लॉकडाऊनच्या काळात डॉ. गिते याच्या शासकीय गाडीतून पोलिसांनी ६ लाख ७० हजार रुपये रोख व महागड्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या होत्या. या प्रकरणी १८ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्यास नोटीस देऊन सोडून दिले होते. २३ एप्रिल रोजी पोलिसांनी डॉ. गिते यास अटक करण्याची परवानगी मिळावी म्हणून कोर्टाला विनंती केली होती. दरम्यान, डॉ. गितेने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.

२४ एप्रिलला जामीन आदेश बदनापूर पोलिस ठाण्यात प्राप्त झाले नसल्याचे तपासणी अंमलदार नितीन ढिलपे यांनी सांगितले. या प्रकरणी डॉ. गितेला निलंबित केले असून गितेच्या गाडीतून जप्त ६ लाख ७० हजार रुपये कुठून आले, ती रक्कम लॉकडाऊन काळात आरोग्य विभागाला उपाययोजनांसाठी प्राप्त झालेल्या निधीतील तर नव्हे ना, तसेच बंद काळात महागडी विदेशी दारू कुठून मिळाली, या प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button