breaking-newsराष्ट्रिय

‘त्या’ खड्ड्यांना निर्मला सीतारमण यांचे नाव

हैदराबाद : हैदराबादमधील जनता खड्डयांमुळे त्रस्त झाली आहे. रस्त्याची डागडुजी व्हावी, खड्डे बुजवावेत म्हणून नेहमी आंदोलने केली जातात. कधी खड्ड्यात झाडे लावली जातात. तर कधी खड्डयांना जलतरण तलावाचे रूप देऊन आंदोलन केले जाते. परंतु हैदराबादमध्ये एक अनोखे आंदोलन केल्याचे दिसून आले. वारंवार तक्रार करूनही रस्त्यावरील खड्डे बुजवले नाही म्हणून नागरिकांनी रस्त्यावरील खड्डे स्वत: बुजवले. या सर्व खड्ड्यांना  महानगरपालिका प्रशासन आणि शहर विकासमंत्र्यांची नावे दिली.

हैदराबादेतील अनेक रस्त्यावरील खड्ड्यांना संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प यांचे नाव देण्यात आले. या सर्व नावांशी केटीआर हे नाव जोडण्यात आले. या भागातील रस्त्यांची दुरूस्ती संरक्षणमंत्र्यांचा अथवा इव्हांकाचा दौरा असतो तेव्हाच केली जाते, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button