breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवसेनेची सामाजिक बांधिलकी ! चिखली परिसरातील दोनशे महिलांना मिळाली नोकरी

पिंपरी । प्रतिनिधी

संकट काळात सर्वसामान्यांच्या मदतीसाठी शिवसेना भोसरी विधानसभा उपशहर प्रमुख नेताजी काशीद यांनी पुढाकार घेत चिखली परिसरातील दोनशे महिलांना नोकरी मिळवून दिली आहे. येत्या काही दिवसांत आणखी शंभर महिलांना नोकरी मिळवून देण्याचा मनोदय काशीद यांनी व्यक्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना काशीद म्हणाले, कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. काहींचे छोटे मोठे व्यवसाय कोलमडून पडले. काहींवर कर्जाचा डोंगर झाला.

त्यामुळे अशा कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. अशा कठीण परिस्थितीत चिखली परिसरातील महिलांनी आमच्याकडे नोकरी मिळवून देण्यासाठी संपर्क केला. त्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून चाकण एमआयडीसीतील वासुली ( ता. खेड) येथील आलेक्स फार्मा ली. या कंपनीत पॅकिंग कामासाठी महिला कामगारांची गरज असल्याची माहिती मिळाली. तिथे संपर्क साधून आजपर्यंत दोनशे महिलांना या कंपनीत नोकरी मिळवून दिली आहे.

आणखी शंभर महिलांना नोकरी देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संकट काळात या दोनशे महिलांना नोकरीचा आधार दिला. त्यांना दरमहा 12 ते 15  हजार रुपये पगार मिळणार असल्याचे काशीद यांनी सांगितले.

सध्या चिखली, मोरेवस्ती, नेवाळे वस्ती, म्हेत्रे वस्ती, ताम्हाणे वस्ती, घरकुल तसेच भोसरी परिसरातील महिलांना नोकरी मिळवून दिली आहे. यासाठी शिवसेना उपशहरप्रमुख नेताजी काशीद यांच्या चिखली -साने चौक येथील जनसंपर्क कार्यालयात नावनोंदणी करण्यात येत आहे. यासाठी शिवसेना भोसरी विधानसभा संघटक रावसाहेब थोरात, उपविभागप्रमुख चंद्रकांत जाधव, संजय गाढवे आणि दादासाहेब ठाकरे यांचे सहकार्य लाभत असल्याचे काशीद यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button