breaking-newsमहाराष्ट्र

… त्यानंतरच उपमुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पहावं; आर.आर.पाटलांच्या कन्येचा आदित्यना टोला

आर.आर.पाटील यांनी राज्यात गुटखाबंदी, डान्सबारबंदी केली. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांचं सरकार उद्योगधंदे बंद करून युवकांना बेरोजगार करत आहे. यंदा सत्तांतर होणार असल्याने आदित्य ठाकरे यांना संधी मिळणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाल घेऊन राजकारण करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी आधी चांगल काम करून दाखवावं, त्यानंतरच उपमुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पहावं, असा टोला आर.आर.पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी लगावला.

आघाडीच्या सरकारने अनेक चांगल्या योजना राबविल्या. त्याच योजनांची नावं बदलण्यात हे सरकार धन्यता मानत आहे. सध्या माय-भगिनींवर बलात्काराचं प्रमाणही वाढलं आहे. सरकार केवळ सत्तेचा दुरूपयोग करून विरोधी पक्षांना संपवण्याचं काम करत आहे. परंतु जनतेला सर्व कळत आहे. त्यामुळे यंदा सत्तांतर अटळ असल्याचं स्मिता पाटील म्हणाल्या. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button