breaking-newsआंतरराष्टीय

डॉ. सुसॅन गिती बनल्या बांगला देशच्या पहिल्या महिला मेजर जनरल

ढाका (बांगला देश)– डॉ. सुसॅन गिती बांगला देशच्या पहिल्या मेजर जनरल बनल्या आहेत. बांगला देशाचे लष्कर प्रमुख जनरल अझीज अहमद आणि क्वार्टर मास्टर जनरल लेफ्टनट जनरल मोहम्मद हक यांनी लष्कराच्या ज्येष्ठ अधिकाऱ्याच्या उपस्थितीत सुसॅन गिती यांना “बॅज’ प्रदान केला. आयएसपीआर (इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स) ने याबाबतची माहिती जारी केली आहे.
1985 साली राजशाही मेडिकल कॉलेजमधून सुसॅन गिती एमबीबीएस झाल्या आणि 1986 साली त्या बांगला देश लष्करात फिजिशियन डॉक्‍टर म्हणूज रुजू झाल्या. सध्या त्या एएफएमसी (आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज) पॅथॉलोजी विभागाच्या अध्यक्षा आहेत. त्यांचे पती ब्रिगेडियर जनरल (निवृत) मोहम्मद हुसेन साद लष्करातील तज्द्न फिजिशियन होते. बांगला देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी महिला सबलीकरणाची मोहीम चालवली आहे. सुसॅन गिती यांना मेजर जनरलची पदोन्नती देणे महिला सबलीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button