TOP Newsताज्या घडामोडीविदर्भ

विदर्भात पूरस्थिती, मानो-यात ढगफुटी, भामरागडचा संपर्क तुटला

नागपूर :  मुसळधार पावसाने संपूर्ण विदर्भात रविवारपासून ठाण मांडले असून अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. अमरावती जिल्ह्यात चांदुर रेल्वे तालुक्यात कोलाड नदीच्या पुराचे पाणी गावात शिरले असून धोत्रा गावातील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. तर भंडारा जिल्ह्यात पाऊळदवणा ते बेला मार्ग तसेच लाखांदूरकडे जाणारा मार्ग पावसामुळे बंद झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील काही रस्ते पुरामुळे बंद झाले आहेत.गडचिरोली जिल्ह्यात भामरागड संपर्क तुटला आहे.

परतीच्या पावसाने नागपूर सह विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. वर्धा मार्गावरील हॉटेल रेडिसन ब्लु जवळील काही वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे. तर मिहानचा मार्ग जलमय झाला आहे. चंद्रपूर शहरातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. अमरावती जिल्ह्यातील नद्या दुथडीभरून वाहत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button