breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

तेलुगू अभिनेते जय प्रकाश रेड्डी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

गुंटूर – तेलुगू अभिनेते जय प्रकाश रेड्डी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते ७४ वर्षांचे होते. आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील आपल्या राहत्या घरी आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत जय प्रकाश रेड्डी यांच्या खलनायक आणि विनोदी भूमिका प्रचंड गाजल्या. अनेक वरिष्ठ आणि युवा कलाकारांसोबत त्यांनी काम केलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, बाथरूममध्ये असताना रेड्डी हे हृदयविकाराच्या झटक्याने खाली पडले. त्यांच्या निधनाबाबत राजकीय आणि मनोरंजन विश्वातून दुःख व्यक्त होत आहे. यंदा जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या महेश बाबू यांच्या ‘Sarileru Neekevvaru’ या चित्रपटातून रेड्डी अखेरचे दिसले.

साल १९८८ पासून जय प्रकाश रेड्डी हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सक्रिय होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १००हून अधिक चित्रपटांत काम केले. प्रेमिंचुकुंदाम रा, समरसिंहा रेड्डी, जयम मनदेरा, चेन्नकेशवरेड्डी, सीतय्या, छत्रपति, गब्बरसिंग, नायक, रेसुगुर्रम, मनम, टेम्पर, सरैनोडु अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button