breaking-newsराष्ट्रिय

तृणमूलकडून ४१ टक्के महिलांना उमेदवारी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील सर्व ४२ जागांवरील तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा केली. उमेदवारी यादीत विद्यमान दहा खासदारांना वगळण्यात आले आहे.

यादीत १८ नवे चेहरे आहेत. विशेष म्हणजे या यादीत ४१ टक्के महिला आहेत. या वेळी ममतांनी भाजवर टीकास्त्र सोडले. ओडिशा, आसाम, बिहार व अंदमानमध्ये तृणमूल काँग्रेस काही जागा लढविणार आहे. पक्षाने १७ महिलांना उमेदवारी दिली आहे. जुन्या नेत्यांखेरीज काँग्रेस व डाव्या आघाडीतून आलेल्या आमदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाने सात मुस्लिमांना संधी दिली आहे. राज्यात ३० टक्के मुस्लीम मतदार आहेत. मुस्लीमबहुल बारिसत मतदारसंघात अभिनेत्री नुसरत जहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. येथील खासदार इद्रीस अली यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. दार्जिलिंगमध्ये गोरखा जनमुक्ती मोर्चाचे आमदार अमरसिंह राय हे तृणमूल काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button