breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तुळजापूरमधील मराठा क्रांती मोर्चा आयोजित करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद – मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी समाज आक्रमक झाला असुन आंदोलन करत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी तुळजापूरमध्ये आंदोलन करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुळजापूरमधील मराठा क्रांती मोर्चा आयोजित करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एकूण ७ जणांवर तुळजापूर पोलिसात १० ऑक्टोबरला रात्री गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोविड प्रसाराची शक्यता निर्माण केली आणि निष्काळजीपणाचे कृत्य केले म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या आंदोलनात खासदार संभाजीराजे छत्रपती सु्द्धा हजर होते.

तुळजापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मार्चात सुमारे २००० हजारांपेक्षा जास्त लोकांनी गर्दी केली होती. गर्दीतील अनेकांनी मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे अशा स्वरुपाचे निष्काळजीपणाचे कृत्य करून कोविड -1१९ च्या प्रसाराची शक्यता निर्माण केली. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे आयोजक सज्जन साळुंके, जिवन इंगळे, अर्जुन साळुंके, महेश डोंगरे, धैर्यशील पाटील, सुनिल नागने आणि अजय साळुंके यांच्यावर भा.दं.सं.कलम 188, 269, 270 आणि म.पो.का. कलम-135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button