breaking-newsमनोरंजन

तुला ‘मन’से सांगणं आहे, वादग्रस्त विधाने करून लोकांना त्रास देऊ नको!

अभिनेत्री केतकी चितळेची रूपाली पाटील यांनी केली कान उघाडणी

छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘एकेरी’ उल्लेख केल्यामुळे स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआमुळे वाद निर्माण झाला आहे. जोशुआने तिच्या स्टँडअपमध्ये महाराजांच्या अरबी समुद्रातील पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींनी तिच्यावर टीका केली. त्यानंतर मराठी अभिनेत्री ‘केतकी चितळे’ने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिने देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला. त्यामुळे सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला.

यासंदर्भात मनसेच्या नेत्या ‘रुपाली पाटील’ यांनी फेसबुक पोस्टद्वारे केतकी चितळेची चांगलीच कान उघाडणी केली आहे. रुपाली पाटील म्हणाल्या की, “केतकी यावेळी तू चुकलीस… मागे तुला ट्रोल केले म्हणून आम्ही महिलेला असे ट्रोल करू नये म्हणून नेटकर्यांना सुनावले होते.

नावडती केतकी दरवेळेला वादग्रस्त विधाने करून लोकांना त्रास देण्याचा काम करतेस, तू सिरीयल मध्ये काम करणारी अभिनेत्री, म्हणून का प्रसिद्धी झोतात राहण्यासाठी वाटेल ती विधाने करून चर्चेस राहण्याचा प्रयत्न करतेस माझी तुला मनसे सांगणे आहे… छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आणि करोडो मावळ्यांचे मनावर ते राज्य करत आहेत.

कितीही शिकलेले असू द्या पण आपली सद्सद्द्विवेक बुद्धी जागी ठेवली नाही तर त्या उच्च शिकण्याचा काहीच उपयोग नाही. कॉमेडी शो मध्ये कवडीमोल नसलेल्या लोकांनी आमच्या आराध्यदेवता बद्दल बोलूच नये. छत्रपती शिवाजी महाराज असतील, महापुरुषश यांच्याबाबतीत लोक संवेदशील असतात अशा दैवता बद्दल, महापुरुषांच्या बद्दल बोलताना ताळतंत्र पाळलेच पाहिजे.

अन्यथा कितीही उच्च शिक्षित मावळे असले तरी ते महाराजांबद्दल बोलणाऱ्या व्यक्तीला त्याची लायकी दाखवल्या शिवाय शंभर फटके हाणून एक मोजल्या शिवाय राहत नाही. याची दखल उच्च शिक्षण शिकूनही बुद्धी नसलेल्या लोकांनी घ्यावी.. हा मनसेचा शेवटचा इशारा आहे.” असा इशारा त्यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button