breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

10 दिवस लॉकडाऊन म्हटल्यावर नागरिकांची खरेदी करण्यासाठी तुफान गर्दी, सर्वच नियम धाब्यावर

पुण्यातील आणि पिंपरीचिंचवडमधील वाढत्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळेअखेर आज म्हणजे सोमवारपासून कडक लॉकडाऊनचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. हा लॉकडाऊन 10 दिवसांचा असणार आहे.यातील पहिले पाच दिवस दूध , वृत्तपत्र तसेच
सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा, आणि मेडिकल दुकाने सोडल्यास काहीह सुरु नसणार आहे.त्यामुळे भाजी आणि किराणा घेण्यासाठी लोकांनी तुफान गर्दी केल्याचे समोर आलंय…

नागरिकांनी खरेदी करण्यासाठी तुफान गर्दी केल्याचे समोर आले. खरेदी करण्यावेळी नागरिकांकडून सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचा देखील गंभीर दखळ घेतली गेली नाही. ऐवढंच नाही तर लॉकडाऊनच्या संधीचा फायदा घेत विक्रेत्यांनीही प्रवाशांची लूट केली. रविवारपासून पोलिसांकडून लॉकडाऊन लागू होणार असल्याने रस्ते बंद करण्यात आले आहेत तसंच जागोजागी बॅरिगेटर्स लावण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी बाजारपेठांमध्ये गर्दी केली.

दुकानांबाहेर नागरिकांच्या लांबलचक रांगा असल्याचे दिसून आले. तर लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल अशी अपेक्षा करण्यात येत होती. परंतु नागरिकांनी सर्वच नियम धाब्यावर ठेवल्याने आता संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात आजपासून ते 23 जुलै पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी या नियमाचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button