breaking-newsआंतरराष्टीय

तुर्कीमध्ये 18 हजार सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून हाकलले

अंकारा: तुर्कीमध्ये सरकारी नोकरीमधील तब्बल 18 हजार 500 कर्मचाऱ्यांना कामावरून तडकाफडकी कमी करण्यात आले आहे. आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या सरकारी आदेशामध्ये या कारवाईचा उल्लेख आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या विरोधात काम करणे आणि दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याच्या संशयावरून ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. या आदेशानुसार 8,998 पोलिस, लष्करातील 9,033 अधिकारी, वायुदलातील 1,949 आणि नाविकदलातील 1,126 कर्मचाऱ्यांबरोबर कायदा मंत्रालय आणि संबंधित मंत्रालयांतील 1,052 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून हाकलण्यात आले आहे. या कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासकीय अधिकारी आणि शिक्षकांचाही समावेश आहे. याशिवाय याशिवाय पोलिस कर्मचारी, लष्करी अधिकारीही कामावरून कमी करण्यात आले आहेत.

तुर्कीमध्ये जुलै 2016 मध्ये अध्यक्ष इर्दोगन यांच्याविरोधात लष्कराने केलेले बंड फसले होते. त्यानंतर देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या आणीबाणीची मुदत सोमवारी संपणार आहे. त्यापूर्वीच हा अखेरचा आदेश लागू करण्यात आल्याचे बोलले जात आहे. 2016 पासून तुर्कीतील तब्बल 1 लाख 10 हजार सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. तुर्कीच्या धोरणांवर टीका करणाऱ्या आणखी हजारो नागरिकांना कामावरून कमी करण्यात आले आहे. आतापर्यंत अशा कर्मचाऱ्यांची संख्या 2 लाखाच्या आसपास आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button