breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तुकोबांनाच काळजी : श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार यांचा घडविला समेट

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – संत तुकाराम महाराज बीजनिमित्त मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी तुकोबांच्या चरणी माथा टेकविला. त्याचवेळी मावळचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे हे देखील तुकोबांचे दर्शन घेण्यासाठी त्याठिकाणी आले होते. पार्थ पवार आणि बारणे यांनी एकत्र तुकोबांचे दर्शन घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना राष्ट्रवादीने मावळची उमेदवारी दिली आहे. त्यांनी ख-या अर्थाने प्रचाराला देखील सुरूवात केली आहे. विद्यमान खासदारावर कोणताही आरोप वा टिका न करता त्यांनी लोकांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे. त्याच्या उलट बारणे यांनी मात्र पार्थ पवार यांच्यावर पाठीमागे टिका केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून पार्थ पवार यांनी देखील ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, मी त्यांच्यावर टिका कशी करू. मी काम करण्यावर भर देतो, अशी प्रतिक्रिया देऊन मनाचा मोठेपणा दाखविला होता.

त्यातच आज देहूत संत तुकाराम महाराजांचे बीज सहोळ्यानिमित्त वारकरी सांप्रदायाची मांदियाळी जमली आहे. तुकोबांच्या चरणी माथा टेकवून पुढील प्रचाराची धुरा हाती घेण्याचा विचार करून पार्थ पवार आज देहूत गेले होते. नेमके त्याचवेळी पुढच्या बाजुला त्यांचे प्रतिस्पर्धक श्रीरंग बारणे उभे होते. त्यामुळे दोघांनी एकदाच तुकोबांच्या चरणी माथा टेकविला. त्यानंतर दोघे आपापल्या प्रचारकार्याला लागले. साक्षात तुकोबांनीच या दोघांचा समेट घडवून आणल्याने दोघांमधील समज गैरसमज दूर होतील अशी अपेक्षा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button