breaking-newsपुणेमहाराष्ट्र

स्मार्टफोनमुळे भारतातील विदावापर विस्तारला

मोबाइलधारकांचा २०२२ पर्यंत डेटावापरावर अधिक खर्च

पुणे : जगभरात स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यातही भारतात २०१७ मध्ये ७१ लाख ६७ हजार १०३ दशलक्ष मेगाबाइट  इतका असलेला एकूण विदा वापर (डेटा कंझम्पशन) २०२२ पर्यंत १० कोटी ९६ लाख ५८ हजार ७९३ दशलक्ष मेगाबाइटवर पोहोचणार असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. याचाच अर्थ मोबाइलधारकांना डेटावापरासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे.

विदा वापर एवढय़ा प्रचंड प्रमाणात वाढण्यामागे ‘व्हिडीओ स्ट्रीमिंग’ हे प्रमुख कारण असल्याचा या अभ्यासातील निष्कर्ष आहे. असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड  इंडस्ट्रीज इन इंडिया (असोचॅम) आणि प्राइसवॉटर हाऊसकुपर (पीडल्ब्यूसी) यांनी संयुक्तपणे केलेल्या ‘व्हिडीओ ऑन डिमांड’ या अभ्यासातून महत्त्वपूर्ण माहिती समोर आली.

इंटरनेटच्या किमतीमध्ये सातत्याने घट होत आहे, तर स्मार्ट फोनधारकांची संख्या वाढत आहे. भारतातील इंटरनेट वापरणाऱ्यांचे प्रमाण २०१७ मध्ये ३०.२ टक्के होते. २०२२ पर्यंत त्यात मोठी वाढ होऊन ते ५६.७ टक्क्यांवर पोहोचणार आहे. मात्र, त्यासाठी कनेक्टिव्हिटी आणि वेग यांमध्ये सातत्य राखणे आवश्यक आहे.

स्मार्ट फोन वापरकर्त्यांचे व्हिडीओ पाहण्याला प्राधान्य असल्याचे या अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांत भारतातील ओव्हर द टॉप (ओटीटी) प्लॅटफॉम्र्स ही स्वतंत्र बाजारपेठ म्हणून विकसित झाली आहे. नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन, झी फाइव्ह, वूट अशा संकेतस्थळांना ओटीटी प्लॅटफॉम्र्स म्हटले जाते.

स्मार्ट फोनधारकांची संख्याही वाढणार

विदाच्या वाढत्या वापरासह स्मार्ट फोनधारकांचीही संख्या दुपटीने वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतात २०१७ मध्ये स्मार्ट फोनधारकांची संख्या ४६८ दशलक्ष एवढी होती. ती २०२२ पर्यंत ८५९ दशलक्षवर पोहोचणार असल्याचे अभ्यासात म्हटले आहे.

होणार काय?

२०२२ पर्यंत भारतातील ओटीटी प्लॅटफॉम्र्सची उलाढाल ५३ हजार ६३० दशलक्ष रुपयांपर्यंत जाईल. त्यामुळे आगामी काळातही स्मार्ट फोनवरील व्हिडीओच लोकप्रिय राहणार आहेत. २०१३ पर्यंत बहुतांश बोलण्यासाठी मोबाइलचा वापर करणाऱ्या सर्वसाधारण भारतीयांच्या खिशातून आता जास्त खर्च विदावर होतो. भारतीयांचा व्हॉइस कॉलसाठीचा खर्च २०१३ ते २०१७ या दरम्यान २१४ रुपयांवरून १२४ रुपयांपर्यंत कमी झाला. तर विदावरील खर्च १७३ रुपयांवरून २२५ रुपयांवर गेल्याचे अभ्यासात नमूद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button