breaking-newsआंतरराष्टीयमहाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्राच्या ‘पाऊलखुणा’

कला-संस्कृतींचे प्रवाशांना दर्शन

महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, वाङ्मयीन, खाद्य आणि कला-संस्कृतींचे दर्शन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना घडणार आहे. विमानतळाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘जय हे’ संग्रहालयातर्फे ‘पाऊलखुणा’ ही संकल्पना साकारण्यात आली आहे.

‘पाऊलखुणा’अंतर्गत महाराष्ट्रातील हस्तकला, वस्त्रकाम, लोकनृत्य, कथाकथन, पारंपरिक वस्तूंचे प्रदर्शन प्रवाशांसाठी आयोजित करण्यात आले आहे. मराठवाडा, खान्देश, विदर्भ, कोकण आणि घाटमाथ्यावरील ऐतिहासिक वास्तू, किल्ले, लोकसंस्कृती, लोकगीत, खाद्यपरंपरा यांची माहिती देणारे आकर्षक भित्तिपत्र विमानतळाच्या विविध भागांत लावण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्य़ांमधील समृद्ध लेण्यांची माहिती देण्यात आली आहे. टाकाऊ  पुठ्ठय़ांपासून प्रतीकात्मक लेणीची रेखीव प्रतिकृती उभारण्यात आली आहे. देवनागरी सुलेखन, वारली चित्रसंस्कृती, कोकणातील गंजिफा चित्र याचे प्रत्यक्ष दर्शन घडवण्यासाठी खास तज्ज्ञ कलाकारांना आमंत्रित के ले आहे. गोंधळ, भारूड, लावणी, नमन, जागरण, बहुरूपी अशा विविध लोककलांचे सादरीकरण यात होणार आहे. विमानतळावर असणाऱ्या अनेक विक्रेत्यांनी आपापल्या व्यवसायातील मराठमोळ्या वस्तू विक्रीस ठेवल्या आहेत. ज्यामध्ये ठुशी, बोरमाळ, मोहनमाळ यांसारखे दागिने, पैठणी, इरकलसारख्या साडय़ांसह लोणची, पापड, कडबोळे यांसारखे मराठमोळे पदार्थ प्रवाशांना चाखायला मिळणार आहे. ‘पाऊलखुणा’च्या निमित्ताने इथे असणाऱ्या रेस्टॉरंट्समध्येही मराठमोळी थाळी, सावजी मटन, आमरस पुरी, सोलकढी अशा मेजवानीचा बेत आखला आहे.

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट विमानतळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. आम्ही कायमच प्रवाशांसाठी काही तरी अभिनव करत असतो. त्यापैकीच ‘पाऊलखुणा’ हा एक उपक्रम आहे. जगभरातील प्रवासी आपल्या विमानतळावर येत असतात. अशा सर्व प्रवाशांना महाराष्ट्राच्या संस्कृतीतील विविधता कळावी आणि ती जगभर पोहोचावी या उद्देशाने ‘पाऊलखुणा’चे आयोजन केल्याची माहिती ‘पाऊलखुणा’च्या संचालकांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button