breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

तीन महिन्यांत मास्कची किंमत तब्बल 250 टक्क्यांनी वाढली

मुंबई | संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे त्याच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी सध्या N95 मास्क आवश्यक बनलेला आहे. ही गरज ओळखून यावरही नफेखोरी मिळविण्यासाठी या मास्कची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली असून N95 मास्कची किंमत 4 महिन्यात 250 टाक्यांनी वाढली. मात्र, त्यावर प्रशासनाला नियंत्रण ठेवता आलेले नाही. परिणामी एन95 मास्कचा काळाबाजार वाढत आहे.

संपूर्ण देशात गेल्या चार महिन्यांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. या विषाणूपासून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना सांगितल्या जात होत्या. यामध्ये स्वच्छतेसोबत आपल्या चेहरा झाकण्यासाठी एन95 मास्क गरजेचा असल्याचेही सांगण्यात आलं. संपूर्ण जगभरामध्ये कोरोनानं घातलेला धुमाकूळ पाहिल्यानंतर मास्क किती महत्वाचा आहे, याची जाणीव झाल्यानंतर या मास्कची निर्मिती करणाऱ्या उद्योजकांनी मास्कची किंमत अव्वाच्या सव्वा वाढवली. शासनाला सप्टेंबर 2019 ला N95 मास्क 12 रुपये 25 पैशांना उपलब्ध होत होते. तर जानेवारी 2020 मध्ये हेच मास्क 17 रुपये 33 पैशांना मिळू लागले आणि मार्चच्या शेवटी पर्यंत 42 रुपयांना हे मास्क मिळू लागले. त्यानंतर मे महिन्याच्या मध्यावधीला 63 रुपयांना हे मास्क उपलब्ध झाले होते.

भारतात तयार होणाऱ्या N95 मास्कच्या किमतीवर जरी नियंत्र आणले, तरीही बाजारात सर्वच ठिकाणी मिळणाऱ्या चायनीज मास्क वर कसे नियंत्रण ठेवणार असा प्रश्न भारतीय उत्पादकांना पडलेला आहे. राज्यात तयार होणाऱ्या एन 95 मास्कच्या दरांचे 3 जून रोजी एक दरपत्रक जाहीर झालेलं आहे. शासनाने कमी केलेल्या दरानुसार 95 ते 165 रुपयांपर्यंतचा दर निश्चित करण्यात आलेले आहेत. सध्या कमी केलेले दर पत्रक हे जानेवारी महिन्यातच्या तुलनेत 450 ते 850 टक्के अधिक आहेत. NPPA मार्फत उत्पादक आणि वितरकांना सूचना मिळाल्यानंतर 47 टक्के या उत्पादकांच्या दरामध्ये घट झालेली आहे. साधारण ही घट 23 ते 41 टक्क्यांनी झाल्याचं निदर्शनास येत आहे. जानेवारी महिन्यात N95 मास्कची किंमत होती त्यापेक्षा सध्या दहापटीने ही किंमत कमी झालेली आहे. बाजारातील चायनीज N95 मास्क वर बंदी आणत सर्व भारतीय कंपन्यांच्या N95 मास्कचे दर एकच ठेवले तरच सामान्य ग्राहकांच्या हिताचा निर्णय होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button