breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तालुका कार्यकारिणीच्या वादामुळे राजकीय वर्तुळात खळबळ थेट जे.पी नड्डांना नोटीस

अहमदनगर – अहमदनगरमधील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी अध्यक्ष जे.पी नड्डा आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाच नोटीस पाठवली आहे.य तालुका कार्यकारिणीच्या निवडीवरून नाराज असल्याने ही नोटीस पाठवण्यात आली आहे. तालुका स्तरावरील वादात चक्क राष्ट्रीय अध्यक्षालाच नोटीस पाठवल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अहमदनगरमधील भाजप कार्यकर्ते सुनील पाखरे आणि नवनाथ गर्जे यांच्या वतीने अ‍ॅड. दिनकर पालवे यांनी नोटीस पाठवली आहे.

तालुका कार्यकारिणीच्या निवड प्रक्रियेत विश्वासात न घेतल्याने सुनील पाखरे आणि नवनाथ गर्जे नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी पाठवलेल्या नोटीसीची दखल न घेतल्यास हे प्रकरण न्यायालयात नेण्याचा इशाराही दिला आहे. महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारिणीच्या स्थापनेनंतर पहिली बैठक दोनच दिवसांपूर्वी पार पडली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नेत्यांना आक्रमक होण्याचा सल्ला दिला. तसेच भाजप पुढील प्रत्येक निवडणुका स्वबळावर लढवेल, असा नाराही त्यांनी दिला.

महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारिणीत कोण कोण?

प्रमुख कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत 12 प्रदेश उपाध्यक्ष, 12 सेक्रेटरी, 6 जनरल सेक्रेटरी आणि 1 कोषाध्यक्ष आहेत. कार्यकारिणीचे सदस्य 69 असतील, तर निमंत्रित सदस्य 139 जण असतील. सर्व आमदार-खासदार कायम सदस्य असतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button