breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

कोरोनाबाधित रुग्णांना दिले जाते चक्क शिळे अन्न, रुग्णांनीच केला भांडाफोड

  • महापालिका प्रशासनाचे या रुग्णालयाकडे सोयीस्कर दुर्लक्ष
  • चांगले जेवन मिळत नसल्यामुळे रुग्णांचे होतायत प्रचंड हाल

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

मोहननगर येथील कामगार विमा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना चक्क निकृष्ट दर्जाचे शिळे अन्न दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न जेवन करता औषधे घेण्याची वेळ रुग्णांवर आली आहे. एवढ्या खालच्या दर्जाचे बेचव अन्न दिले जात आहे. पालिकेच्या अशा गलथान कारभारामुळे कोरोनाबाधीत रुग्णांच्या जीवाला कोविड 19 विषाणुने नव्हे तर उपासमारीने दगा फटका होण्याची भीती निर्माण झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणुने अक्षरषः थैमान घातले आहे. घरातील नागरिकांना सुध्दा अस्वस्थ वाटावे असे वातावरण संपूर्ण शहरात निर्माण झाले आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे महापालिकेने काही कोरोनाबाधीत रुग्णांना मोहननगर येथील कामगार विमा रुग्णालयामध्ये ठेवले आहे. वैद्यकीय विभागामार्फत त्यांच्यावर औषधोपचार केले जात आहेत. मात्र, त्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवन दिले जात आहे. जेवन बेचव आणि शिळे असल्याने रुग्ण जेवन न करताच औषधे घेत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. ठेकेदार बेचव अन्न पुरवठा करत असल्यामुळे रुग्ण देखील ते खात नसल्याचे समोर आले आहे. अक्षरषः अन्न वाटोळे होतानाचा व्हिडिओ ‘महाईन्यूज’कडे प्राप्त झालेला आहे. आपण पाहू शकता…

कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये ज्येष्ठ नागरिक देखील आहेत. त्यांना सुध्दा शिळ्या प्रकारचे जेवन दिले जात आहे. पिंपरी चिंचवड शहरातील रूग्णांना चांगले जेवण मिळावे, याकरीता महापालिका लाखो रूपये खर्च करते. पण संबंधित ठेकेदारांकडून पुरवण्यात येणा-या अशा दर्जाहिन जेवणामुळे रुग्णांचे हाल सुरू आहेत. जेवन पुरवणा-या संबंधीत ठेकेदारावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कारवाई करावी, अशी मागणी तेथील रुग्णांनी केली आहे. यासंदर्भात रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधीत रुग्णांनी आयुक्तांना पत्र लिहिले आहे. त्यावर 16 रुग्णांच्या स्वक्षरी देखील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button