breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

तामिळनाडूचे कृषीमंत्री दोराईकन्नूंचे कोरोनाने निधन

चेन्नई – तामिळनाडूचे कृषिमंत्री आर. दोराईकन्नू यांचे शनिवारी रात्री ११.१५च्या सुमारास कोरोनाने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. १३ ऑक्टोबर रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून ते रुग्णालयात उपचार घेत होते.

तामिळनाडूचे कृषिमंत्री दोराईकन्नू पापनासम विधानसभा मतदारसंघातून ३ वेळा विधानसभेवर निवडून आले होते. ते राज्याचे कृषिमंत्री होते. १३ ऑक्टोबरला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्यांना कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले, अशी माहिती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अरविंदन सेल्वराज यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button