breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

तापमानवाढीमुळे कोरोनाची लागण होणार नाही ?

कोरोना विषाणूमुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. हा विषाणू भारतात पसरू नये यासाठी अधिक खबरदारी घेतली जात आहे. तर दुसरीकडे उन्हाळ्यात तापमानात वाढ झाल्यानं कोरोना विषाणूचा धोका टळेल असा अंदाज वर्तवला जात आहे, मात्र हा गैरसमज आहे, तापमानवाढीमुळे कोरोनाची लागण होणार नाही ही केवळ आपण बाळगलेली खोटी आशा आहे असा इशारा चीनमध्ये झालेल्या संशोधनातून देण्यात आला आहे.  चीनमध्ये तापमान ८ अंशांहून अधिक झाल्यानं कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. 

तापमान वाढल्यानं कदाचित कोरोनाची तीव्रता कमी होईल मात्र कोणत्याही देशानं या आशेवर अवलंबून राहू नये कारण या विषाणूंवर सर्दी खोकला पसरवणाऱ्या इतर विषाणूप्रमाणे हवामान बदलाचा विशेष परिणाम होत नाही असं निरिक्षण तज्ज्ञांचं आहे. 

कमी तापमान असलेल्या देशांमध्ये कोरोना हा जास्त तापमान असलेल्या देशांच्या तुलनेत अधिक वेगानं पसरेल असा तूर्त अनेकांचा अंदाज होता. मात्र या एका गोष्टींवर कोणीही अवलंबून राहू नये इतकंच तज्ज्ञांचं म्हणणं आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे केरळ.  भारतात केरळमध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला, इथल्या हवेत आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे त्याचप्रमाणे तापमानही ३२ अंश सेल्शिअस आहे.

चीनप्रमाणे हार्वर्ड विद्यापीठातही तापमान वाढ आणि कोरोना यावर संशोधन करण्यात आलं. तापमान वाढीमुळे  कोरोनाचा प्रसार कमी होईल असं मानून चालणं हे योग्य नाही असं या संशोधनातून सुचवलं आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button