breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात आमदार शेळके दाम्पत्यास पूजेचा मान!

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून यंदा आषाढी वारी अत्यंत साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या ३३५ व्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने योग्य आणि सर्व नियमांच पालनं करत योग्य असं नियोजन करण्यात आलं आहे.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यातील पुजेचा मान यंदा मावळचे आमदार सुनिल शेळके व त्यांच्या पत्नी सौ सारिका शेळके या दाम्पत्यास देण्यात आला..देऊळवाड्यात मंदिर प्रदक्षिणेसाठी फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये पादुका ठेवण्यात आल्या. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे व सर्व विश्वस्त, सरपंच, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंगचे पालन करत वारकऱ्यांनी आज देहू येथील मुख्य मंदिरात हातात भगव्या पताका घेऊन, टाळ, मृदंगाच्या तालावर ज्ञानोबा- तुकाराम म्हणत हरी नामाचा गजर करत किर्तन सोहळा केला . यावेळी सर्वच वारकरी सुरक्षित अंतरावर उभे होते तसंच प्रत्येकाने मास्कही परिधान केला होता… त्यांच्या या वागण्यातून त्यांनी जणू जगाला माऊलीच्या भक्तीसह शिस्तबद्धतेचाही संदेश दिला.

देऊळवाड्याच्या मंदिर प्रदक्षिणेत वारकऱ्यांनी ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष आणि विठुनामाचा गजर करीत वारकऱ्यांनी फुगड्या धरल्या.. एवढचं नाही तर या वारखऱ्यांसोबत सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या आमदार आणि खासदारांनीही फुगड्यांचा फेर धरला… यंदाच्या या साधेपणाने योजिलेल्या पालखी सोहळ्यामुळे नक्कीच प्रत्येक वारकरी हा दुखावला असणार पण सध्याचं जागतिक कोरोनाचं संकट पाहता माऊलीही सगळं समजून घेईलं असा विश्वासही त्यांना आहे. हे जगावर रेंगाळत असलेलं कोरोनाचं संकट लवकर निघून जावं हीच माऊली चरणी प्रार्थना.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button