breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

…तर मुंबई कायमची सोडेन! कंगनाचं गृहमंत्र्यांना आव्हान

मुंबई – अभिनेत्री कंगना राणावत ड्रग्ज सेवन करते का? याची राज्य सरकारतर्फे चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली. यावर आता कंगना राणावतने ट्विट केले असून आपली ड्रग्ज टेस्ट करण्याचे आव्हान दिले आहे. तसेच पुरावा सापडल्यास आपली चूक मान्य करून मुंबई कायमची सोडणार, असेही तिने म्हटले आहे.

कंगनाने ट्विट केलंय, ‘मुंबई पोलीस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची मी आभारी आहे. कृपया माझी ड्रग्ज टेस्ट करा. माझे सर्व कॉल रेकॉर्ड तपासा. जर तुम्हाला ड्रग्ज तस्करांसोबत माझा कोणताही संबंध आढळला तर मी माझी चूक मान्य करेन आणि कायमची मुंबई सोडून देईन. तुमच्यासोबतच्या भेटीची वाट पाहते.’

दरम्यान, कंगनाविरोधात कारवाई केली जावी यासंदर्भात प्रताप सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती. त्यावर उत्तर देत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, अध्ययन सुमनसोबत कंगना राणावतचे प्रेमसंबंध होते. अध्ययन सुमनने एका मुलाखतीत असे म्हटले होते की कंगना ड्रग्ज घेते आणि ते घेण्यासाठी मलाही बळजबरी करते. अध्ययन सुमनच्या या वक्तव्याच्या आधारे ही चौकशी केली जाणार आहे असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच या प्रकरणी मुंबई पोलीसही लक्ष घालतील असेही त्यांनी स्पष्ट केले. विधानभवनाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button