breaking-newsपिंपरी / चिंचवड

मॉल, मल्टिप्लेक्स याठिकाणी मोफत पार्किंग करा, शहर मनसेची मागणी

पिंपरी, (महाईन्यूज) – पुणे महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने  शहरातील मॉल, मल्टिप्लेक्स याठिकाणी मोफत पार्किंग करावी, अशी मागणी शहर मनसेच्या वतीने आयुक्त श्रावण हार्डीकर यांना करण्यात आली आहे.

यासंदर्भात मनसेच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मॉल, मल्टीप्लेक्समध्ये, हॉस्पिटल, ईत्यादी ठिकाणी पार्किंग शुल्क १० रुपयेपासुन १०० रुपयेपर्यंत आकारले जातात. अनेक संस्थानी यावर आवाज उठविला. परंतु, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. ही बाब आता न्यायालयात गेली असून न्यायालयाच्या आदेशानुसार आणि धोरणानुसार मॉल, मल्टिप्लेक्स याठिकाणी पार्किंग शुल्क आकारणे बेकायदेशीर ठरविण्यात आले आहे.

पुणे शहर आणि परिसरात असलेल्या मॉल व मल्टिप्लेक्समध्ये पार्किंग शुल्क आकारण्यात येणार नाही असा ठराव पुणे महापालिकेच्या शहर सुधारणा समिती मध्ये १४ जून रोजी मंजुर करण्यात आला. त्याच धोरणानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील मॉल, मल्टिप्लेक्स इत्यादी ठिकाणी पार्किंग निःशुल्क करावे, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

आयुक्तांना निवेदन देताना मनसेचे शहर अध्यक्ष सचिन चिखले, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष हेमंत डांगे, सचिव रुपेश पटेकर, महिला सचिव सीमा बेलापुरकर, उपाध्यक्ष चंद्रकांत दानवले, राजु सावळे, विभाग अध्यक्ष प्रतीक शिंदे, मयूर चिंचवडे, उपविभाग अध्यक्ष सुरेश सकट आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button