breaking-newsपुणे

तरुणाची गळफास घेवून आत्महत्या; पोलिसांवर आरोप

पुणे – जमीन खरेदीचा व्यवहार फिस्कटल्यानंतर जमीन मालकाने पैसे परत केले नाहीत, तसेच या प्रकरणामध्ये पोलिसांनी गांभीर्याने दखल न घेता दुर्लक्ष केल्यामुळे एका तरुणाने रविवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना हडपसरमधील गोंधळेनगर परिसरात सोमवारी घडली. दरम्यान आपल्या आत्महत्येस जमीन मालक व पोलिस अधिकारी जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाने चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

स्वप्नील दशरथ सपकाळ (वय 33, रा. गोंधळेनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सपकाळ यांनी 2016 मध्ये घर बांधण्यासाठी राजेंद्र मोरे याच्याकडून प्लॉट खरेदी केला होता. मात्र त्यांच्यातील व्यवहार फिस्कटल्यामुळे सपकाळ यांनी मोरेला दिलेले पैसे मागण्यास सुरवात केली. सुरवातीला मोरेने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर त्याने सपकाळ यांनी दिलेले धनादेश बॅंकेमध्ये वटले नाहीत.

या प्रकारामुळे त्रस्त झाल्याने सपकाळ यांनी हडपसर पोलिसांकडे दाद मागितली. मात्र पोलिसांनी संबंधित प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याचे सांगून या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नाही. याप्रकरणी सपकाळ यांनी हडपसर पोलिसांकडे सातत्याने दाद मागूनही पोलिस निरीक्षक (गुन्हे) व सहाय्यक पोलिस निरीक्षकाने त्यांना प्रतिसाद दिला नाही. तर दोन दिवसांपूर्वी सपकाळ यांनी पोलिसांकडून या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याच्या कारणावरून आत्महत्या करण्याबाबतचा एक मेसेज वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील तांबे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना पाठविला होता. त्यानुसार त्यांनी सोमवारी पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

...म्हणून त्या दोघी वाचल्या ! 
सपकाळ यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्या चिठ्ठीमध्ये आपल्या मृत्यूस प्लॉटचा मालक राजेंद्र मोरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), सहाय्यक पोलिस निरीक्षकच जबाबदार असून त्यांना सोडू नका, असा उल्लेख केला आहे. “माझी गरोदर पत्नी व छोट्या मुलीलाही मी बरोबर नेणार होतो. पण मी दोन महिने विचार केला. नंतर मी एकट्यानेच जीवन संपविण्याचा निर्णय घेतला.” अशा शब्दात सपकाळ यांनी चिठ्ठी लिहिली आहे. पत्नी व मुलीला संपविण्याचा प्रारंभी आलेला विचार सपकाळ यांनी बदलला, व स्वतःच आत्महत्या केली. त्यामुळे दोघींचा जीव वाचल्याची सद्यःस्थिती आहे.

“ऑगस्ट 2017 मध्ये सपकाळ यांची राजेंद्र मोरे याच्याविरुद्धची जमिनीच्या व्यवहारासंबंधीची तक्रार हडपसर पोलिसांकडे दाखल झाली होती. तपास केल्यानंतर हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्यामुळे त्यांच्याकडे सपकाळ यांनी दाद मागावी, असे त्यांना सांगितले होते. दरम्यान, सपकाळ यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मोरेसह पोलिस निरीक्षक (गुन्हे) शिंदे व सहाय्यक पोलिस निरीक्षक लोंढे यांच्या नावे लिहिली आहेत. परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिलेल्या आदेशानुसार संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची कसून चौकशी करण्यात येईल.” – सुनील तांबे, पोलिस उपायुक्त, हडपसर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button