TOP Newsताज्या घडामोडीपुणे

संस्कृत शिकण्याकडे वाढता कल

पुणे : ‘भारत विद्या’ या ऑनलाइन शैक्षणिक व्यासपीठाच्या आधारे संस्कृत शिक्षण घेण्यासाठी उदंड प्रतिसाद लाभत असून तीन आठवडय़ात विविध वयोगटातील सहाशेहून अधिक जणांनी या अभ्यासासाठी सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे देवांची भाषा आणि गीर्वाण वाणी असा लौकिक असलेल्या संस्कृत भाषा शिकण्याचे आकर्षण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्राच्यविद्या संशोधन क्षेत्रात जगभरात नावलौकिक संपादन केलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने विकसित केलेल्या ‘भारत विद्या’ ऑनलाइन शैक्षणिक व्यासपीठाचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे विविध अभ्यासक्रम या व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी काही अभ्यासक्रम सशुल्क असले तरी ऑनलाइन संस्कृत अभ्यासक्रम मोफत आहेत. 

संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन म्हणाले,की ऑनलाइन संस्कृत अभ्यासक्रम हा बोली संस्कृतवर भर देणारा आहे. यामध्ये नाम म्हणजे अक्षर, सर्वनाम, क्रियापद आणि संधी याची ओळख करून दिल्यानंतर वाक्यरचना आहे. त्यानंतर वाक्य बनविण्यास शिकवण्यात येते. २२ मिनिटे ते ३० मिनिटे या कालावधीचा एक व्हिडीओ अशा स्वरूपाचे १२० व्हिडीओ करण्यात आले आहेत. त्यापैकी २० व्हिडीओ शैक्षणिक व्यासपीठावर ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर दर दहा-पंधरा दिवसांनी दहा व्हिडीओ ठेवण्यात येणार आहेत.

तीन आठवडय़ांत..

मोफत ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी तीन आठवडय़ांमध्ये सहाशेहून अधिक जणांनी प्रतिसाद दिला आहे. विविध अभ्यासक्रमातील भाग व्हिडीओ व्याख्याने स्वरूपात असून काही अभ्यासक्रमांमध्ये ही व्याख्याने डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी दिली.

‘भारत विद्या’ या ऑनलाइन शैक्षणिक व्यासपीठाला तीन आठवडय़ांमध्ये दहा हजारांहून अधिक जणांनी भेट दिली आहे. त्याद्वारे ‘पर्व ऑफ महाभारत’, ‘वेद विद्या’, ‘फंडामेंटल्स ऑफ आर्किऑलॉजी‘ आणि ‘भारतीय दर्शनशास्त्र-एक परिचय’ या अभ्यासक्रमांना अनेक नागरिकांनी प्रवेश घेतला असून अनेकांनी प्रवेशासाठी उत्सुकता दाखविली आहे. – भूपाल पटवर्धनकार्यकारी मंडळाचे अध्यक्षभांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button