breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तब्बल 600 डुक्करांना शहरातून अन्य ठिकाणी हलवले, पालिकेची कारवाई

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत शहरातील उपद्रवकारक भटकी, मोकाट डुकरे अटकाव करणे व त्यांची शहराबाहेर विल्हेवाट लावणेची मोहीम १० दिवस राबविण्यात आली.

यामध्ये ६०० पेक्षा जास्त डुकरांना शहराच्या विविध भागांमधून पकडण्यात आले. आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्या मार्गदर्शनासाठी पशुवैद्यकीय अधिकारी अरुण दगडे व अतिक्रमण विभागामार्फत हि कारवाई करण्यात आली.

या मोहिमेमध्ये दि. ११ डिसेंबर २०१९ रोजी अडथळा आणल्याप्रकरणी भोसरी येथील पवित्रा सिंग भोंड या व्यक्तीवर कलम ३५३ व ५०६ अंतर्गत शासकीय कामात अडथळा आणलेबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. आज या व्यक्तीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ७ दिवसांची न्यायायलीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button