breaking-newsताज्या घडामोडी

तब्बल अडीच महिन्यानंतर सोलापूरात मद्यविक्रीस परवानगी, तेही घरपोच…

कोरोना रुग्णांची संख्या ही महाराष्ट्रात इतर ऱाज्यांच्या तुलनेत झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे सर्वांत जास्त कठोर लॉकडाऊनचे नियम होते ते महाराष्ट्रात लागू केले होते. मात्र आता काही नियम हे शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे काही महत्त्वांच्या नियमांसह हळू हळू पुर्ववत येत आहे..मग यात दुकांनांना नियमित वेळेत दुकानं सुरु करण्याची परवानगी असो किंवा मद्यविक्रीला परवानगी देण असो. मात्र काही ठिकाणी मद्यविक्रीस परवानगी देण्यात आली नव्हती .जसं की सोलापूरमध्ये कोरोना रुग्ण सापडण्याचं प्रमाण जास्त असल्यानं तिथे मात्र मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली नव्हती. पण आता अखेरअडीच महिन्यानंतर सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात मद्यविक्रीस परवानगी मिळाली आहे.

तब्बल अडीच महिन्यानंतर सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात मद्यविक्रीस परवानगी देण्यात आली आहे . आणि फक्त परवानगीच नाही तर चक्क दारू घरपोच म्हणजे होम डिलिव्हरी करण्यात येणार आहे. तर ग्रामीण भागात दुकानातून दारु विक्री करता येणार आहे.

मात्र जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्रात दारु बंदी कायम असणार आहे. मद्यविक्री करताना शासनाने लागू केलेले नियम पाळणे विक्रेत्यांवर बंधनकारक असणार आहे. असा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button