breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

सोशल मीडियावर भाजप-राष्ट्रवादीत जुंपली

मुंबई – लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनीही उमेदवारांची यादी जाहीर केले आहे. तसेच राजकीय पक्षाच्या सभा, मेळावे घेवून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येवू लागला आहे. त्यात सोशल मीडियावर भाजप-राष्ट्रवादीत जुपंली असून व्यंगचित्रातून टीका करण्यात येत आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या भाजपने व्यंगचित्राच्या माध्यमातून विरोधकांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर एक व्यंगचित्र काढले होते. रणछोडदास काका, बारामतीचा पोपट आणि भविष्य या शिर्षकाखाली राज आणि पवारांचे व्यंगचित्र होते. यात शरद पवार हे राजला म्हणतात, राज तुझं काहीच भविष्य दिसत नाही. त्याला राज, पवार काकांकडेही काहीच काम उरलेले दिसत नाही असे संवाद दाखवण्यात आले होते.

या व्यंगचित्राला राष्ट्रवादीने देखील व्यंगचित्राद्वारेच उत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी हे शरद पवारांचा हात धरुन चालताना दाखवण्यात आले आहे. यात मोदी म्हणतात, पवारांनीच राजकारणात मला बोट धरुन चालायला शिकवलं असे संवाद दाखवले आहेत.

https://twitter.com/NCPspeaks/status/1106820719940460544

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button