breaking-newsपुणेमहाराष्ट्र

ढोल-ताशा पथकांची परदेशांतही गर्जना

  • तरुणांचा उदंड उत्साह : बाप्पांच्या आगमनानिमित्त सरावाला वेग

पुणे – लाडक्‍या गणपती बाप्पांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यासाठी ढोल-ताशा पथकांचा सराव जोरात सुरू आहे. अवघ्या आठ दिवसांवर गणेशोत्सव आल्यामुळे सरावाला वेग आला असून, नदीपात्र परिसर ढोल-ताशाच्या आवाजाने दणाणला आहे. तर, सरावादरम्यान नवनवीन ठेके ऐकायला मिळत आहेत. यंदा पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पथकांची संख्या यंदा वाढली आहे. दरम्यान, पुण्याच्या “ढोल-ताशा संस्कृती’ची गर्जना आता देशासह परदेशांतही पसरत आहे.

सध्या डी.जे.च्या गाण्यांवर थिरकणारी तरुणाई ढोल-ताशा पथकांकडे वळत आहे. त्यामुळे गणेशोत्सव आणि ढोल-ताशा पथकांचे वादन हे समीकरण ठरलेले आहे. शहरात 120 पथकांची अधिकृत नोंदणी असून, 20 ते 25 पथके नोंदणी नसलेली आहेत. विशिष्ट पेहराव, लयबद्ध वादन, नवनवीन ठेके, शिस्तबद्धपणा आणि पथकासमोर हातात भगवा झेंडा यासह संबळ, शंख, टोल या वाद्यांचा समावेश हे पथकांचे वैशिष्ट्ये आहे. वादन पाहण्यासाठी नागरिकांची नेहमीच गर्दी होते आणि या पथकांमुळे गणेशोत्सवामध्येही संस्कृतीचे दर्शन होत आहे.

ढोल-ताशा पथकाची संस्कृती पूर्वीपासून आपल्याकडे आहे. परंतू, गणेशोत्सवात ही संस्कृती मागील काही वर्षांपासून आली आहे. सुरूवातील काही ठराविक पथकेच गणेशोत्सव, नवरात्रीत वादन करत होते. परंतू, कालांतराने पथकांची संख्या वाढत गेली आणि आज ही संख्या शंभरावर गेली आहेत. मुठा नदीपात्रात ढोल-ताशा वाजायला लागले की गणेशोत्सवाची चाहूल लागते. पथकाकडून दरवर्षी गणेशोत्सवाच्या एक ते दीड महिना आधी सराव सुरू होतो. मात्र, पावसामुळे सरावाला यावर्षी उशीर झाला.

यंदा नदीपात्रामध्ये सर्वाधिक प्रमाणात पथके सराव करत आहे. पोलिसांनी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत सरावाला परवानगी दिली आहे. तसेच 30 ढोल आणि 5 ताशांना परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्वच पथके सायंकाळी सराव करतात. त्यामुळे आता सरावाचा वेग वाढत आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच पथकांमध्ये वादन करतात. परंतु, नेहमीप्रमाणे तरुणांची संख्या मोठी असून आयटी कर्मचाऱ्यांचाही सहभाग मोठा आहे. त्यामुळे प्रत्येक पथकाच्या सरावामध्ये उदंड उत्साह दिसून येतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button