breaking-newsआंतरराष्टीय

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगमनाअगोदर अमेरिकन हरक्युलिस विमान स्नायपर्ससह दाखल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प हे तीन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. ट्रम्प दाम्पत्यांच्या भारत दौऱ्याची सुरूवात २४ फेब्रुवारी २०२० पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमधून होणार आहे. तत्पूर्वी त्यांच्या सुरक्षव्यवस्थेसाठी भारताकडून सर्वोतोपरी खबरदारी घेतली जात आहे. एवढच नाहीतर ट्रम यांचे भारतात आगमन होण्याअगोदरच अमेरिकेच्या हवाई दलाचे हरक्युलिस विमान व स्नायपर्स अहमदाबाद विमानतळावर सोमवारी दाखल झालेले आहे.

अहमदाबादमधील मोटेरा स्टेडिअमवर २४ फेब्रवारी रोजी ट्रम्प यांच्या स्वागताचा भव्य कार्यक्रम होणार आहे. या ठिकाणी अत्यंत काटेकोर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. तसेच, सुत्रांच्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या तीन तासांच्या गुजरात दौऱ्यासाठी तब्बल १०० कोटींचा खर्च करण्यात येत आहे.अमेरिकेच्या हवाई दलाच्या हरक्युलिस विमानात ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रणा आणली गेली आहे. ज्यामध्ये त्यांच्या ताफ्यातील वाहनांसह विशेष अग्निशमन यंत्रणा व स्पाय कॅमेरे आदींचा समावेश आहे. एवढेच नाहीतर असं देखील सांगितलं जात आहे की, ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी अमेरिकन सुरक्षा एजन्सी सीआयाएचे २०० विशेष कमांडो देखील त्यांच्याबरोबर असणार आहेत. ते भारतीय पोलिसांसह अन्य प्रशासकीय सुरक्षा यंत्रणांशी समन्वय साधुन राहणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button