breaking-newsराष्ट्रिय

पुलवामा हल्ल्याच्या ३० मिनिटं आधी पंतप्रधान मोदी करत होते ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’चं शुटिंग

पुलवामा हल्ल्याच्या ३० मिनिटं आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी मॅन व्हर्सेस वाईल्ड या डिस्कव्हरी चॅनलच्या शुटिंगमध्ये व्यस्त होते अशी माहिती समोर आली आहे.  १४ फेब्रुवारी या कार्यक्रमाचे शुटिंग करण्यात आले. ४५ मिनिटांच्या या शुटिंगमध्ये मोदी व्यग्र होते अशी माहिती काही सरकारी सूत्रांनी ही माहिती दिली आहे. ‘टाइम्स ऑफ  इंडिया’ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. डिस्कव्हरी चॅनलवर हा एपिसोड १२ ऑगस्ट रोजी प्रसारित केला जाणार आहे.

पंतप्रधान मोदी ज्या भागात आहेत त्या भागाचं शुटिंग जिम कॉर्बेट पार्कमध्ये करण्यात आलं. बेअर ग्रिल्सने ट्विटरवर टिझर पोस्ट करत यासंदर्भातली माहिती दिली. ‘जगभरातील १८० देशांच्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची या आधी कधीही न पाहिलेली बाजू पहायला मिळेल. प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि वातावरणातील बदलाकडे लक्ष्य वेधण्यासाठी मोदी भारतामधील जंगलांमधून फिरताना दिसतील मात्र या कार्यक्रमाचे शुटिंग पुलवामा हल्ल्याच्या आधी झाल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे विरोधक या मुद्द्यावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे.

या कार्यक्रमाचं शुटिंग १४ फेब्रुवारी झालं हे आम्ही नाकारलेलं नाही. त्यादिवशी जो हल्ला झाला त्याबाबत आम्ही जेव्हा पंतप्रधानांना माहिती दिली तेव्हा चिडले होते. आम्ही त्यांना चार वाजता कळवलं मात्र ते आमच्यावर चांगलेच चिडले होते मला तुम्ही या हल्ल्याबाबत आधी का सांगितलं नाहीत? असं त्यांनी विचारल्याचंही सरकारी सूत्रांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी तातडीने इतर फोन करून परिस्थितीचा आढावा घेतला आणि दिल्लीत पोहचले असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमाचा चेहरा म्हणजे बेअर ग्रील्स हा जगभरामध्ये त्याच्या साहसासाठी प्रसिद्ध आहे. एखादा माणूस संकटात अडकला तर तो कसा वाचू शकेल याबद्दलचे प्रात्यक्षिके दाखवणारा बेअरचा चेहरा ‘डिस्कव्हरी’वरील ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’मुळे घराघरात पोहचला आहे. जंगलामध्ये एकटेच अडकल्यावर आपण नैसर्गिक साधनांचा वापर करुन लोकवस्तीपर्यंत कशाप्रकारे पोहचू शकतो याबद्दल भाष्य करणारा ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ कार्यक्रम प्रेक्षकांच्या खास पसंतीस पडला असून १८० हून अधिक देशांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित होतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button