breaking-newsमहाराष्ट्र

यवतमाळमध्ये पोलीस ठाण्याच्या आवारात हवालदाराची गोळी झाडून आत्महत्या

यवतमाळमधील दंगलविरोधी पोलीस पथकात कार्यरत असलेल्या हवालदाराने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. अनिस पटेल (वय २८ वर्षे) असे या हवालदाराचे नाव आहे.

दंगलविरोधी पोलीस पथकात कार्यरत असलेले अनिस पटेल यांनी बुधवारी सकाळी पुसद पोलीस ठाण्यात सभागृहाच्या मागील बाजूस स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पटेल यांचा मृतदेह दिग्रस येथील मूळगावी पाठवण्यात आला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील ,पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button