breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी साजरी केली दिवाळी

वॉशिंग्टन : भारतात सुरू असणाऱ्या दिवाळी सणाची धामधुम सातासमुद्रापारही पहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील अमेरिकेत दिवाळसण साजरा करण्यात येत आहे. त्यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील हिंदू, जैन, शिख आणि बौद्ध धर्मीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. अमेरिकेमध्ये दिव्यांचा उत्सव साजरा करणे म्हणजेच अमेरिकेच्या महत्त्वपूर्ण सिद्धांत धार्मिक स्वातंत्र्याचे स्मरण करणे होय, असे ट्रम्प म्हणाले.

दिवाळीच्या एक दिवस आधी ट्रम्प यांनी ओव्हल कार्यालयात अमेरिकी-भारतीयांबरोबर दिवाळी साजरी केली. या कार्यक्रमात प्रसिद्धी माध्यमांना प्रवेश नव्हता. संपूर्ण अमेरिकेत दिवाळी साजरी होत आहे, हे म्हणजे अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्यतेचे द्योतक असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

भारतासह, अमेरिका आणि संपूर्ण जगभरात विखुरलेले भारतीय दिवाळी साजरी करत असताना ट्रम्प यांनी हे उद्गार काढले. अमेरिकी राज्यघटनेने या देशातील लोकांना दिलेल्या अधिकारांचे माझ्या प्रशासनाने रक्षणच केले आहे. या देशातील सर्व धर्मीयांना त्यांच्या प्रथा आणि विवेकानुसार पूजा करण्याचा अधिकार आहे. दिवाळी साजरी करणाऱ्यांना त्यांनी मेलानियांसह शुभेच्छा दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button