TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवड

हवामानातील बदलांमुळे ऑक्सिजनचे महत्व लोकांना पटू लागले: दिनेश यादव

कुदळवाडीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

पिंपरी : दिनेशभाऊ यादव युवा मंचच्या वतीने आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. ०५) रोजी कुदळवाडीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांच्या जनसंपर्क कार्यालयात उपस्थित श्री दिपक घन, विठ्ठल शिंदे, ताजुद्दीन खान, वैभव वाघ मान्यवरांच्या हस्ते राॅयल प्लाझा येथे सर्वांना विविध रोपांचे वाटप व वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थित होते.आंबा, गुलमोहर, बदाम, कडुनिंब, जांभूळ, आवळा, अशोक, निलगिरी अशा अनेक वृक्षांचे रोपण करण्यात आले.

दिनेश यादव म्हणाले, कोरोनामुळे आज ऑक्सिजनचे व पर्यायाने पर्यावरणाचे महत्व लोकांना आज पटू लागले आहे. त्याच्या दुर्लक्षामुळे प्रदूषण होतेय व अनेक आजारांना निमंत्रण मिळते. शहरीकरणाच्या भोवऱ्यात पर्यावरणाची सुरक्षा मात्र भरकटत आहे. हे थांबवायला हवं. शासनाने पर्यावरण रक्षणासाठी तयार केलेल्या कायद्याचे पालन केले पाहिजे. प्रत्येकाने एक कापडी पिशवी जवळ बाळगल्यास रोजच्या कचऱ्यातील प्लास्टिक पिशव्या कमी होऊ शकतात. तसेच ओला आणि सुका कचरा वेगळा करुन त्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावली तर पर्यावरण स्वच्छ व सुंदर होईल. आजच्या पर्यावरण दिनी प्रत्येकाने एकतरी झाड लावण्याचा संकल्प करावा, असे आवाहन यादव यांनी यावेळी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button