breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डॉक्टर महिलेच्या नावाचा वापर करून अनेकांची फसवणूक

पिंपरी |महाईन्यूज|

अनेक दिवस मोबईल फोनमध्ये रिचार्ज न केल्याने सिमकार्ड बंद पडले. ते सिमकार्ड कंपनीने नव्याने सुरु करून त्याची विक्री केली. अज्ञात व्यक्तीने ते सिमकार्ड खरेदी केले. त्यानंतर ते सिमकार्ड पूर्वी वापरत असलेल्या डॉक्टर महिलेच्या नावाचा आणि फोटोचा वापर करून महिलेच्या ओळखीच्या लोकांकडून पैशांची मागणी करून पैसे घेतले. याबाबत अज्ञातावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 12 सप्टेंबर पासून 20 ऑक्टोबर या कालावधीत चिखली परिसरात घडला आहे.

डॉ. उत्कर्षा धनंजय चितळे (वय 25, शरदनगर, चिखली) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 20) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 9168640152 आणि 8482902877 हे क्रमांक वापरत असलेल्या इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टर चितळे यांच्याकडे 8482902877 हा क्रमांक होता. त्यावर त्यांनी सहा महिन्यांपासून रिचार्ज केला नाही. त्यामुळे तो नंबर बंद झाला. कंपनीने तो नंबर पुन्हा सुरु करून त्याची विक्री केली. तो नंबर दुस-या व्यक्तीने खरेदी केला. 8482902877 नंबर वापरणा-या व्यक्तीने डॉ. चितळे यांचा फोटो आणि नाव वापरून त्यांच्या ओळखीच्या लोकांना व्हाटसअप द्वारे संपर्क केला.

ओळखीच्या लोकांना वेगवेळी कारणे देऊन त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. ते पैसे आरोपीने 9168640152 या क्रमांकावर गुगल पे द्वारे पाठवण्यास सांगितले. काही जणांकडून त्याने तब्बल 16 हजार रुपये गुगल पेद्वारे स्वाकारले. याबाबत पैसे पाठवणा-या नागरिकांची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button