breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus|’कोरोना’मुळे मृत्युमुखी पडलेल्या बुलडाण्यातील रुग्णाच्या कुटुंबातील दोघांना लागण
बुलडाणा | ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडलेल्या बुलडाण्यातील व्यक्तीच्या कुटुंबाच्या चिंतेत भर पडली आहे. कुटुंबातील आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आहे.
‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडलेल्या बुलडाण्यातील रुग्णाच्या कुटुंबातील आणि संपर्कात आलेल्या 60 जणांना काल विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं होतं. त्यातील 34 जणांचे नमुने चाचणीसाठी नागपूरला पाठवण्यात आले होते. 20 जणांचे ‘कोरोना’ रिपोर्ट निगेटिव्ह आले, उर्वरित व्यक्तींपैकी दोघा जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बुलडाणाकरांची डोकेदुखी वाढली आहे.