breaking-newsराष्ट्रिय

डेरा प्रमुख राम रहीमला मिळणार ४२ दिवसांचा पॅरोल

डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह यांना ४२ दिवसांसाठी पॅरोल मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता त्यांचे तुरूंगाबाहेर येणे जवळपास निश्चित आहे. राम रहीम यांच्यावतीने ४२ दिवसांच्या पॅरोलसाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. ज्यानंतर तुरूंग अधिक्षकांकडून जिल्हा प्रशासनास पत्र देखील पाठवण्यात आले आहे.

हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील सुनारिया येथील शेतीच्या कामांसाठी पॅरोलची मागणी केल्यानंतर डेरा सच्चा सौदा संप्रदाय प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह यांना ४२ दिवसांचा पॅरोल देण्यात येणार असल्याची चिन्ह आहेत. १८ जून रोजी यासंदर्भात पाठवण्यात आलेल्या पत्रात गुरमीत यांची तुरूंगातील वर्तवणुक ठीक असल्याचे तसेच त्यांनी कोणत्याही नियमाचे उल्लंघन देखील केले नसल्याचे सांगण्यात आले होते.

ANI

@ANI

Haryana Min KL Panwar on reports of parole granted to Ram Rahim: All convicts are entitled to parole after 2 yrs. If a convict has good conduct in jail, it’s mentioned by superintendent in his report to local police. It goes to Commissioner after verification, he takes final call

ANI यांची इतर ट्विट्स पहा

याप्रकरणी हरियाणाचे मंत्री कृष्ण लाल पंवार यांनी याबाबत सांगितले की, कोणत्याही कैद्यास दोन वर्षांनंतर पॅरोलचा अधिकार आहे. गुरमीत राम रहीम यांनी यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार तुरूंग अधिक्षकांनी जिल्हा प्रशासनास पत्र पाठवून उत्तर मागवले आहे. आता यावर निर्णय घेण्याचे काम जिल्हा प्रशासन व पोलिसांचे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button