breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इंद्रायणीतील हजारो माशांचा मृत्यू संशयास्पद; उच्चस्तरीय चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

  •  मारुती भापकर यांनी दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन
  • दोषींवर कोठोर कारवाई करण्याची केली मागणी

पिंपरी, (महाईन्यूज) – श्री क्षेत्र देहूतील इंद्रायणी नदी प्रदुषणामुळे हजारो देवमासे व खवले मासे मृत्यु पावले आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन असा गंभीर प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून आवश्यक त्या सर्वतोपरी उपाययोजना राबवुन यातील दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

यासदंर्भात भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, एका जाहीर कार्यक्रमात पवित्र इंद्रायणी प्रदुषण हे पिंपरी चिंचवडकरांचे पाप आहे. असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यानंतर आजपर्यंत इंद्रयणी व पवना नदीचे प्रदुषण रोखण्यात २०१४ पासून भाजप सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांबरोबर आपण व आपले सरकारी ही तितकेच जवाबदार व पापाचे वाटेकरी आहात, असा आरोप भापकर यांनी केले आहे.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ प्रस्थान १५ दिवसावर आला असताना प्रशासनाकडून सोहळ्याची लगभग सुरु झाली आहे. श्री क्षेत्र देहुगाव येथील पवित्र इंद्रायणीच्या पात्रात किना-यावर अज्ञात कारणाने रविवार (दि. ९) हजारो मृत मासे आढळले. दुषीत झालेल्या पाण्यातील ऑक्सिजन (प्राणवायू) संपुष्ठात आल्याने माशांचा मृत्यु होतोय. त्यामुळे आपण स्वत: वेळ काढून जातीने लक्ष घालून इंद्रायणी, पवना नद्यांच्या उगमापासून शहरापर्यंत तज्ञांकडून तपासणी करावी. ह्या नद्या प्रदुषीत होऊ नये म्हणून सर्वतोपरी उपाययोजना राबवुन दोषी असणा-यांवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी भापकर यांनी निवेदनात केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button