breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डिजिटल युगामुळे पर्यटन व्यवसाय विकासात भर – धनंजय शेडबाळे 

पिंपरी, (महा ई न्यूज) – सध्या अनेक व्यवसाय हे ऑनलाईन उपलब्ध आहेत. आजच्या तरुणांपर्यंत आणि जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीपर्यंत क्षणार्धात पोहोचायचे असेल, तर आपला किंवा आपल्या उद्योगाचा ‘डिजिटल प्रेझेन्स’ असणे अत्यंत आवश्यक आहे. भरघोस उत्पन्न आणि स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या पर्यटन व्यवसायानेही डिजिटल युगाची पावले ओळखत कात टाकणे गरजेचे झाले आहे. त्यामुळेच २०१८ च्या पर्यटन दिनासाठी खास ‘पर्यटन आणि डिजिटल परिवर्तन’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती धनंजय शेडबाळे यांनी निगडी येथे व्यक्त केले. 
 
निगडी येथील नॉव्हेल  इन्स्टियूटच्या एनआयबीआर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या वतीने जागतिक  पर्यटनदिनानिमित्त पर्यटन व डिजिटल परिवर्तन या विषयावर धनंजय शेडबाळे बोलत होते. यावेळी नॉव्हेल इन्स्टिटयूटचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे, कॉलेजचे प्राचार्य वैभव फंड आदी उपस्थित होते. यावेळी  पर्यटन आणि डिजिटल परिवर्तन याविषयावर चित्रफित दाखविण्यात आली. 
 
धनंजय शेडबाळे म्हणाले की, डिजिटल क्रांती मोठ्या प्रमाणात झाल्याने पर्यटन क्षेत्रावरही त्याचा परिणाम झाला आहे. पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात ऑनलाइनकडे वळला आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून पर्यटन क्षेत्रात  कल्पक आणि नावीन्यपूर्ण प्रयोग घडून यावे यासाठी यंदाच्या जागतिक पर्यटन दिवसासाठी हीच संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. शाश्वत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पर्यटन क्षेत्रात करण्याचा विचार ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेसह महाराष्ट्रही ही संकल्पना घेऊन जागतिक पर्यटन दिन साजरा करीत आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button