breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका सभागृहात शिवसेनेर्फे पाणी पुरवठा विभागाचा निषेध

पिंपरी (महा ई न्यूज) – पवना धरणात मुबलक पाणी असताना पाणी पुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे चिंचवड भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांच्या तक्रारी येऊ लागल्याने प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेविका आश्विनी चिंचवड यांनी आज गुरूवारी (दि. 27) सर्वसाधारण सभेत पाणी पुरवठा विभागातील प्रशासनाचा निषेध केला.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे ब्रीद वाक्य म्हणजे “कटीबद्धा जनहिताय” यास अनुसरून सर्वांना समान, शुद्ध आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे महापालिकेचे कर्तव्य आहे. गणेशोत्सव कालावधीत व त्या नंतरदेखील सणासुदीच्या काळात चिंचवड परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत असून गौरी गणपती, ऋषीपंचमी, हरितालिका व चातुर्मास कालावधीत अपुऱ्या व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे .

शहरातील अनेक महिला नोकरी करून कौटुंबिक जबाबदारी सांभाळून आपले सण, संस्कृती संवर्धनाचे काम करतात. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांची दिनचर्या, दैनंदिन कामकाज बिघडून नागरिक व महिला भगिनींना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही भागात केवळ अर्धा तास आणि तेदेखील कमी दाबाने पाणी पुरवले जाते. पाणी न येणे, उशिरा येणे, कमी दाबाने येणे यामुळे गणेशोत्सव व त्यानंतरच्या काळात आज रोजीपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत आहे.

चिंचवडमध्ये समान व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणेकामी पाणीपुरवठा विभागाला योग्य त्या सूचना द्याव्यात. अन्यथा आम्हा महिला भगिनींना रणरागिणीच्या रूपाने तीव्र आंदोलन करावे लागेल. याबाबत  महापालिकेच्या सभागृहात पाणीपुरवठा विभागास जाब विचारला असता अधिकारी निरुत्तर होते. त्यामुळे चिंचवडे यांनी पाणी पुरवठा विभागातील प्रशासनाचा सभागृहात जाहीर निषेध केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button