breaking-newsमनोरंजन

डान्सर अभिनेत्री सपना चौधरीचा काँग्रेसमध्ये प्रवेश

डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरीने आज अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सपना चौधरी काँग्रेस प्रवेश करणार अशी चर्चा होती त्यावर अखेर आता शिक्कामोर्तब झाले आहे. काही वेळापूर्वीच सपना चौधरीने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सपना चौधरी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या संपर्कात होत्या.

ANI

@ANI

Delhi: Dancer and actor Sapna Chaudhary joins Congress party.

1,218 people are talking about this

डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता त्या मथुरा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार आणि अभिनेत्री हेमा मालिनींविरोधात उभ्या राहू शकतात. अशीही शक्यता वर्तवण्यात येते आहे. काँग्रेस पक्षात सपना चौधरी यांनी प्रवेश केला आहे आता त्यांना उमेदवारी दिली जाणार का? आणि त्या मथुरेतून लढणार के हे पहाणे महत्त्वाचे आहे.

हेमा मालिनी आणि सपना चौधरी दोन्ही लोकप्रिय चेहरे आहेत. हेमा मालिनी यांच्याविरोधात जर काँग्रेसने सपना चौधरींना उभे केले तर ही लढत निश्चितच चुरशीची होईल. मथुरा मतदार संघातील जाट समाजाला आकर्षित करून घेण्यासाठी सपना चौधरी काँग्रेसला मदत करू शकतात. सपना चौधरी या काँग्रेसमध्ये जातील असे अंदाज वर्तवण्यात येत होते. आज अखेर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button