breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डांगे चाैकातील ग्रेडसेपरेटर वरुन वाद; स्थानिक व्यापाऱ्यांनी पुकारला बंद

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

थेरगाव येथील डांगे चाैकातील ग्रेडसेपरेटर वादाच्या भोव-यात सापडला आहे. स्थानिक व्यापा-यानी भूसंपादनास विरोध दर्शविला आहे. तसेच या ग्रेडसेपरेटरने आमच्या व्यवसाय अडचणीत येत असून आम्हाला ग्रेडसेपरेटर नकोच, अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान, बंद पाळून सत्ताधा-याचा निषेध व्यक्त केला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून डांगे चौकात गेल्या काही दिवसांपासून ग्रेड सेपरेटरचे काम सुरू केले आहे. मात्र हे काम करताना एकाच बाजूने अधिक जमीन संपादित केल्याने व्यवसायावर गदा आल्याचा आरोप करत आज व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. जमलेल्या व्यापाऱ्यांनी महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करत पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली.

ग्रेड सेपरेटर काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. डांगे चौकात पूर्णपने ४५ मीटर रस्ता रुंदीकरण करावा. तसेच डांगे चौकातील फळवाले, भाजी व्यावसायिक, रिक्षाचालक, टेम्पो चालक व अन्य पथारी व्यावसायिकांना हटवून रस्ता १५० फूट मोकळा करावा. त्यांनतर समप्रमाणात दोनही बाजूला ग्रेड सेपरेटर करावे अशी जोरदार मागणी व्यापाऱ्यांनी केली. वाकड ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महेश स्वामी यांनी व्यापाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलाविण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button