breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

डम्परच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

महाईन्यूज | मुंबई

  • डोंबिवलीत डम्परची दुचाकीला धडक

खंबाळपाडा येथे मंगळवारी सकाळी डम्परच्या धडकेत दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात दोन वर्षांचा मुलगा बचावला असून, त्याच्यावर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी डम्परचालक मुकेश गुजर याला अटक केली.गणेश चौधरी (३२), त्यांची पत्नी उर्मिला (२५) आणि मुलगी हंसिका (४) हे तिघे जण अपघातात जागीच ठार झाले. तर मुलगा ओम (२) जखमी झाला आहे.

चौधरी कुटुंब कल्याणमधील चिंचपाडा परिसरात वास्तव्यास होते. गणेश आणि उर्मिला हे डोंबिवलीतील फडके रोड परिसरात भाजीविक्री करायचे. गणेश हे मंगळवारी सकाळी पत्नी, मुलासह मुलगी हंसिकाला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून जात होते. खंबाळपाडा येथे त्यांच्या दुचाकीला डम्परने धडक दिली. त्यात गणेश, उर्मिला आणि हंसिका यांचा मृत्यू झाला तर ओम जखमी झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button