#Coronavirus: घाबरू नका; कुठल्याही स्थितीस तोंड देण्यास भारत सज्ज – केंद्रीय आरोग्य मंत्री
करोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली तरी सरकार पूर्णपणे तयार असल्याचा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे. विकसित देशांमध्ये आहे तितकी गंभीर परिस्थिती आपल्याकडे निर्माण होणार नाही असंही ते म्हणाले आहे. दरम्यान देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या ५९ हजार ६६२ वर पोहचली आहे.
हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे की, “इतर विकसित देशांप्रमाणे आपल्याकडे परिस्थिती अत्यंत गंभीर होण्याची शक्यता आम्हाला वाटत नाही. मात्र तरीही गंभीर परिस्थितीला तोंड देण्याच्या दृष्टीने आम्ही पूर्ण तयारी केली आहे”.
We do not anticipate a very worst type of situation in our country like many other developed countries but still we have prepared the whole country for the worst situation: Dr Harsh Vardhan, Union Health Minister #COVID19 pic.twitter.com/TE8A7sviJt
— ANI (@ANI) May 9, 2020