breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

बैलगाडा शर्यत निकालानंतर पुणे विमानतळावर आमदार महेश लांडगे यांचे जल्लोषात स्वागत

पिंपरी | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. या लढ्याचे नेतृत्तव करणारे आमदार महेश लांडगे आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या पदाधिका-यांचे नवी दिल्ली येथून पुणे विमानतळावर गुरुवारी रात्री आगमन झाले. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बैलगाडा शर्यतप्रेमी यांनी आमदार लांडगे यांचे जल्लोषात स्वागत केले.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ केंद्र सरकारकडे गेले. तेंव्हापासून आमदार महेश लांडगे यांनी बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. शेवटी हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने सर्व बाजू लक्षात घेत बैलगाडा शर्यतीसाठी सशर्त परवानगी दिली. यामुळे महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे.

महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजाचा असलेला लढा अखेर यशस्वी झाला आहे. हा विजय महाराष्ट्रातील बळीराजाचा आणि सर्जा-राजाचा अर्थात शेतकऱ्याला जीव लावणाऱ्या बैलजोडींचा आहे, अशा प्रतिक्रिया बैलगाडा प्रेमींमधून उमटू लागल्या आहेत.

आमदार महेश लांडगे यांच्यावर राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला, लढाईला यश मिळाल्याने बैलगाडा प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आमदार महेश लांडगे पुण्यात आले. पुणे विमानतळावर लांडगे यांच्या स्वागतासाठी बैलगाडा प्रेमी, लांडगे यांचे चाहते मोठ्या संख्येने विमानतळावर उपस्थित होते. सर्व कार्यकर्त्यांनी आमदार लांडगे यांचे जल्लोषात स्वागत केले.

दिल्लीहून पुण्यात आल्यानंतर आमदार महेश लांडगे म्हणाले, “बैलगाडा शर्यतीचा निकाल सुप्रिम कोर्टात लागल्यानंतर आज दिल्लीवरुन भोसरीमध्ये आलो आहे. घरी आल्यावर माझ्या आईसह कुटुंबातील सर्वांचा आनंद गगनात मावत नव्हता. रात्री साडेबारा नंतरही घरामध्ये आनंदाने दिसणारे चेहरे पाहून हाती घेतलेल्या कामाचे चीज झाल्याचे समाधान होते.

बैलगाडा शर्यतीचा सुप्रिम कोर्टात निकाल लागल्यानंतर पुणे विमानतळावरुन बैलगाडा मालकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी निमगाव दावडी येथे आलो. दावडीच्या श्री. खंडोबाला नवस बोलला की तो पूर्णच होतो. याची प्रचिती पुन्हा एकदा आली. देवाच्या मानाची पहिली स्पर्धा निमगाव दावडी येथे व्हावी अशी अपेक्षा बैलगाडा संघटनेच्या पदाधिकारी यांच्याकडे केली असल्याचेही आमदार महेश लांडगे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button