टेलर, निकोल्स यांची शतके आणि न्यूझीलंडचा मालिका विजय
नेल्सन- अनुभवी रॉस टेलर आणि प्रतिभावान नवोदित खेळाडू हेन्री निकोल्स यांनी केल्या दमदार शतकी खेळींच्या जोरावर न्यूझीलंडने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा 112 धावांनी पराभव केला. त्याचबरोबर तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडने 3-0 असा विजय मिळवत श्रीलंकेला व्हाईटवॉश दिला.
नाणेफेक जिंकून श्रीलंका संघाने न्यूझीलंड संघाला फलंदाजीचे आमंत्रण दिले. न्यूझीलंडच्या सलामीवीरांना स्वस्तात माघारी पाठवण्यात लसिथ मलिंगाला यश आले. कर्णधार केन विलियम्सन आणि रॉस टेलर यांनी शतकी भागीदारी केल्यावर विलियम्सन 55 धावा करून बाद झाला. त्यानंतर टेलरने निकोल्सच्या साथीने संघाचा डाव सावरला. टेलर 137 धावबाद बाद झाला.
निकोल्सने आक्रमक शतक पूर्ण करत धावसंख्या 350च्या पुढे नेली. निकोलस 124 धावांवर नाबाद राहिला.
न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले 364 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात आलेल्या श्रीलंकेचे सुरुवात चांगली झाले. परंतु, नंतर ठरावीक अंतराने त्याचे गाडी बाद होत गेले. थिसरा परेराने श्रीलंकेसाठी 80 धावांची खेळी केली. परंतु, शेवटचे चार फलंदाज फक्त 1धाव जोडू शकल्याने त्यांचा मोठा पराभव झाला.