breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

#EuroCup2020 डेन्मार्कचा फिनलँडकडून लाजिरवाणा पराभव

कोपनहेगन – युरोपचा फुटबॉल वर्ल्डकप म्हणून ओळखला जाणाऱ्या युरो कपला शनिवारी दणदणीत सुरुवात झाली. काल झालेल्या फिनलँड विरुद्ध डेन्मार्क सामन्यात फिनलँडने बलाढ्य डेन्मार्कचा १-० पराभव करून इतिहासात नाव कोरले. विशेष म्हणजे प्रथमच प्रमुख आणि मोठ्या स्पर्धेत खेळत आहे. दरम्यान, या सामन्यादरम्यान डेन्मार्कचा खेळाडू ख्रिश्चियन एरिक्सन मैदानावर कोसळल्याने हा सामना स्थगित करण्यात आला. एरिक्सनची प्रकृती ठीक असल्याचे समोर आल्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला.

सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघाचे खेळाडू आक्रमक अंदाजात पाहियला मिळाले, मात्र पहिल्या सत्रात त्यांना गोल करता आला नाही. जास्तीत जास्त वेळ फुटबॉल स्वत:जवळ ठेवण्यात डेन्मार्क संघाला यश आले. २३२ वेळा त्यांनी आपल्या खेळाडूंकडे फुटबॉल पास केला. तर फिनलँडच्या संघाने १४१ वेळा फुटबॉल पास केला. डेन्मार्कच्या संघाला ६ कॉर्नर शूटआउट मिळाले. मात्र या संधीचे गोलमध्ये रुपांतर करण्यास त्यांना अपयश आले. त्यानंतर एरिक्सन बेशुद्ध झाल्यामुळे सामना थांबवावा लागला. परंतु त्याची प्रकृती स्थिर आहे हे कळल्यानंतर सामन्याला पुन्हा सुरुवात झाली.

मग दुसऱ्या सत्रात डेन्मार्कने एरिक्सनशिवाय खेळायला सुरुवात केली. या सत्रात डेन्मार्कला गोल करण्याच्या संधी मिळाल्या पण ते संधी साधण्यात अपयशी ठरले. सामन्याच्या ५९व्या मनिटाला फिनलँडच्या पोहजांपालोने सुरेख गोल करत आघाडी मिळवली. पोहजांपालोचा हा गोल संघाला ऊर्जा देणारा ठरला. त्यानंतर डेन्मार्कच्या प्रत्येक हल्ल्याचा बचाव करण्यात फिनलँडला यश आले. डेन्मार्कची पेनल्टी किकही व्यर्थ गेली. अखेर सामन्याची वेळ संपल्यानंतर फिनलँडच्या चाहत्यांनी आणि खेळाडूंनी जल्लोष साजरा केला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button